शेतकरी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढीची मागणी

farmer
farmer

सफाळे : गेल्या दोन दिवसांपासून परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असून बळीराजा जरी एका बाजुने सुखावला असला तरी दुसरया बाजुने कर्जमाफीच्या लाभार्थी  शेतक-यांची ऑनलाईन अर्ज भरायला साईबर कॅफेत रांग लागत आहे. दिवसभर भर पावसात शेतकऱ्यांवर "भिक नको पण कुत्रा आवर "अशी अवस्था आली आहे. 

राज्यातील शेतकरयांना कर्ज माफी साठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी  31 जुलै ही अंतिम तारीख दिली आहे.  त्या नुसार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सायबर मध्ये पन्नास रूपये तर काही ठिकाणी शंभर रूपये फी आकरली जात आहे. सरवहर फेल, थमस डिवहाईस बंद तसेच कनेक्क्टीव्हटी गेल्यावर एक अर्ज भरायला किमान अर्धा ते पाऊणतासाचा वेळ जातो,कर्जमाफी अर्ज घ्यायला दिवसभर रांगेत उभे राहवे लागत आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना  शहरात जावे लागते. त्यासाठी  एका अर्जासाठी किमान पाचशे रूपये खर्च येत आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे 19000 लाभाथी शेतकरी असून गेल्या दोन दिवसांपूर्वी फक्त 1239 शेतकरयांनी ऑनलाईन अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून मिळाली आहे. 

शासनाने शेतक-यांची कर्जमाफी करायला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली.कर्जमाफी साठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाने रान उठविले,शेतक-यांच्या भाभावनांचा आदर करीत शासनाने ही योजना घोषित केली.विरोधकांसह सत्ताधारी पक्षाने कर्जमाफी श्रेय लाटण्यासाठी होर्डिग्ज, बॅनर लावून मोठी प्रसिद्धी मिळवली खरी , पण प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 
विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करताना वैयक्तिक माहिती, आधारकार्ड क्रमांक, रजिस्टर मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड, पत्नीची माहिती, उत्पन्नाची माहिती नमूद करावी लागते. काही शेतक-यांच्या पत्नीचे निधन झाले असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच   आधारकार्ड नोदणी केली पण अजून कार्ड हातात आली नाहीत. कुटूंबियांच्या सर्व सदस्यांची मिळून 1.50 लाखा पेक्षा कमी असणारी रक्कम मुद्दल व.व्याजासह  रक्कम माफीस पात्र आहे. पुर्नगठीत केलेल्या पिक कर्जासाठी अनूज्ञेय लाभ मिळण्यास पात्र आहे.हे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची ऑनलाईन अर्ज दाखल करायला गर्दी वाढत आहे.

आधारकार्ड नोदणीच्या वेळी रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांकावर व्हीएटी क्रमांक येतो,तो टाकल्यावरच अर्ज दाखल होऊन त्याची पोच मिळते.बराच प्रमाणात शेतक-यांनी आधारकार्ड नोदणी करताना दाखल केलेला नंबर सांगता येत नाही.

पालघर तालुक्यात सफाळे, मनोर, नागझरी, चहाडे नाका आदी ठिकाणी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी दिवसातून दहा ते पंधरा अर्जच भरता येतात. शेतक-यांची वाढती गर्दी पाहून एका दिवसात हा फाॅर्म भरता येत नाही.त्यासाठी किमान दोन- दोन दिवस  गेल्याचे एका शेतक-यांनी सांगितले. विहित मुदतीत सदर अर्ज भरता येणे अशक्य असल्याने या मुदतीत वाढ करण्यात यावी अशी शेतकरयांची मागणी आहे. 

"ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बरयाच गोष्टींची आवश्यकता आहे. मात्र शासनाचे शेतकरयांना योग्य मार्गदर्शन नसलयाने शेतकरी हैराण झाले आहेत. आम्ही आमच्या काटाळे विविध सहकारी सोसायटी मार्फत सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे. मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळ जात असल्याने शासनाने मुदतवाढ करावी "
- महेंद्र अधिकारी, चेअरमन काटाळे विविध सहकारी सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com