बांबू लागवड योजनेची माहिती देण्यासाठी टोकावडे येथे शेतकरी मेळावा

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 25 मे 2018

आर्टिसन अग्रिटेक कंपनीचे प्रतिनिधी एच. के. जगताप यांनी शेतकऱ्यांना बांबू शेतीची वैशिष्ट्ये शेतीसाठी मजूर, खत, पाणी याचा कमी येणारा खर्च तसेच जमिनीची सुपीकता वाढते, याबाबत माहिती दिली.

मुरबाड (ठाणे) - उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजने अंतर्गत बांबू लागवड योजनेची माहिती देण्यासाठी टोकावडे येथे शुक्रवारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चिंतामण घोलप, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश पवार यांचेसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

आर्टिसन अग्रिटेक कंपनीचे प्रतिनिधी एच. के. जगताप यांनी शेतकऱ्यांना बांबू शेतीची वैशिष्ट्ये शेतीसाठी मजूर, खत, पाणी याचा कमी येणारा खर्च तसेच जमिनीची सुपीकता वाढते, याबाबत माहिती दिली. कृषी विभागाचे प्रकल्प संचालक पी एम चांदवडे यांनी शेतकऱ्यांना बांबू शेतीची प्रात्यक्षिके व बांबू शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी कृषी विभागामार्फत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार कृषी अधिकारी गोकुळ जाधव, मधुकर कुर्ले आदींनी परिश्रम घेतले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Farmers Meet at Tokavade to provide information on Bamboo plantation scheme