'आयुष्य सुंदर आहे' संकल्पनेवर फॅशन शो

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - अप्रतिम स्टाईल आणि उत्कृष्ट निवड यासाठी प्रसिद्ध असलेल्या "ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर'चे 12 वे पर्व मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये नुकतेच पार पडले. प्रसिद्ध डिझायनर मनीष अरोरा याच्या स्टायलिश डिझाईनने या सोहळ्यात रंगत आणली. कंगना राणावत या फॅशन शोची "शो स्टॉपर' होती.

मनीषने "इंडियन' हे कलेक्‍शन सादर केले. त्याने डिझाईन केलेल्या सोनेरी भारतीय पण वेगळ्या पोषाखात कंगना अतिशय सुंदर दिसत होती. अरोरा यावेळी म्हणाला की, हे कलेक्‍शन समकालीन भारतीय स्त्रीच्या अंतरंगाचे दर्शन घडवते. जगभरातील कलाकुसरीचे प्रदर्शन मांडणारा हा एक प्रचंड कॅलिडोस्कोप आहे. "आयुष्य सुंदर आहे' हे सत्य मांडणारी एक समंजस स्टाईल तयार करणे हा यामागील उद्देश आहे.

या सोहळ्याच्या वेळी रघू दीक्षित यांच्या "मिडिवल पंडित्झ ग्रुप'च्या निवडक गाण्यांचा कार्यक्रमही झाला.