लठ्ठ पोलिस निरीक्षक शस्त्रक्रियेनंतर घरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - कुणालाच लठ्ठपणा आवडत नाही. मलाही माझे लठ्ठ शरीर आवडत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर मला नवी स्फूर्ती मिळाली आहे. आता आरोग्याबाबत जनजागृती करणे मला आवडेल, अशा शब्दांत दौलतराम जोगावत यांनी आपली भावना व्यक्त केली. रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी मोठ्या उत्साहाने तीन किलो वजन कमी झाल्याचे सांगितले. 

मध्य प्रदेशातून उपचारांसाठी मुंबईत आलेले पोलिस निरीक्षक जोगावत यांना चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की पोलिसांना वेळेवर आणि चांगले जेवण मिळत नाही. त्यांना व्यायामालाही वेळ मिळत नाही. परिणामी, त्यांचे आरोग्य बिघडते. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार आणि व्यायाम करणे आवश्‍यक आहे. शस्त्रक्रियेनंतर हलके वाटत आहे, असे ते म्हणाले. डॉ. मुजफ्फल लकडावाला यांनी सांगितले, की जोगावत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यांचे वजन 180 किलो होते. आता एक ते दीड वर्षात ते 80 किलोवर येईल. त्यांच्या आहारात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यांना द्रवपदार्थ, प्रोटीन शेक आणि पालेभाज्या असा आहार करण्यास सांगितले आहे.

Web Title: Fat inspector at home after surgery