उमेदवार मुलगी; प्रचार वडिलांचा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - आरक्षणामुळे महिलांना उमेदवारी मिळाली असली तरी प्रचार,बैठकांपर्यंतची सर्व धुरा कुटुंबातील पुरुषच हाताळत आहेत. उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक नऊ मध्येसुद्धा असाच प्रकार सुरू आहे.

उल्हासनगर - आरक्षणामुळे महिलांना उमेदवारी मिळाली असली तरी प्रचार,बैठकांपर्यंतची सर्व धुरा कुटुंबातील पुरुषच हाताळत आहेत. उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक नऊ मध्येसुद्धा असाच प्रकार सुरू आहे.

पॅनेल क्रमांक नऊमधील ‘अ’ प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यामुळे  राष्ट्रवादीचे नगरसेवक नरेंद्र कुमारी ठाकूर यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी यूडीएकडून मुलगी डिम्पल हिला उमेदवारी मिळवली. ती कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे; मात्र पोस्टर, बॅनर्स, स्टिकर्सवर तिच्याऐवजी वडिलांचे छायाचित्र व नाव दिसत आहे. याबाबत शिवसेना उमेदवार रिंकू सुनील केदारे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हा गैरप्रकार असून, महिला सक्षमीकरणाविरोधात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी तोरस्कर म्हणाले की, याप्रकरणी आम्ही संबंधित उमेदवाराला नोटीस दिली आहे. ही बाब उल्हासनगर पालिका व पोलिस प्रशासनाला कळवली आहे.

मुंबई

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा...

05.24 AM

मुंबई  - आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड उभारण्याकरिता 30 हेक्‍टर जागा घेण्याचा आटापिटा सरकार करत आहे; परंतु या व्यवहारात 18...

05.12 AM

मुंबई - कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे रखडलेले निकाल कधी जाहीर करणार, याची माहिती दोन दिवसांत देण्याचे आदेश मुंबई उच्च...

04.30 AM