रुग्णांची आर्थिक पिळवणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

तुर्भे - नवी मुंबईत डेंगू व मलेरियाच्या साथीने थैमान घातले असताना खासगी रुग्णालयात मात्र रक्त व इतर तपासणीसाठी रुग्णांकडून वारेमाप पैसे उकळले जात आहेत. रक्त तपासणीसाठी रुग्णांना एक हजार 200 ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. महापालिकेने तुर्भे व कोपरखैरणे येथील रुग्णालयाच्या इमारती धोकादायक झाल्याने बंद केल्या आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. 

तुर्भे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात जावे लागते. तेथे रुग्णांची संख्या जास्त व कर्मचारी कमी असल्याने त्यांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला मुंबईतील केईएम किंवा नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात जावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने गेल्या महिन्यात बोनसारी गावातील तरुणाला जीव गमवावा लागला होता. डेंगीच्या रक्त तपासणीसाठी खासगी रुग्णालयात एक हजार 200 ते दीड हजार रुपये घेतले जातात. हा खर्च झोपडपट्टीतील रहिवाशांना झेपत नाही. त्यामुळे ते उपचार घेऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे, या परिसरात घरटी डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण आहेत. त्यामुळे पालिका रुग्णालयात जागा नाही. याचा गैरफायदा खासगी दवाखाने घेत आहेत. ते रुग्णांकडून भरमसाठ पैसे उकळतात. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. या सर्व प्रकारात मात्र गरीब रुग्णांची फरफट होत आहे. 

टॅग्स