मुंबई: एअर इंडियाच्या इमारतीला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - नरिमन पॉईंट परिसरातील एअर इंडियाच्या इमारतीच्या 22 व्या मजल्याला आज (मंगळवार) सकाळी भीषण आग लागली. या आगीत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या 22 व्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सकाळी पावणे सातच्या सुमारास ही आग लागली होती. 22 व्या मजल्यावर आग लागली असल्याने अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. 

दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली असून, जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

टॅग्स