मुंबईत इमारतीला आग; दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवीत, इमारतीतील 11 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली.

मुंबई - कफ परेड भागातील मेकर टॉवरच्या 20 व्या मजल्याला आज (मंगळवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कफ परेड भागातील मेकर टॉवर या रहिवाशी इमारतीतील 20 व्या मजल्याला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. धुराचे लोट बाहेर येऊ लागल्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवीत, इमारतीतील 11 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली.

या इमारतीत बजाज इलेक्टॉनिक्सचे मालक शेखर बजाज यांचे कुटुंबही वास्तव्यास होते. यांची सुटका करण्यात आली आहे.

टॅग्स