पाच बेकायदा इमारतींवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई - वर्सोवा गावठाणात उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारतींवर पालिकेने हातोडा उगारला आहे. कारवाईत पाच बेकायदा इमारती पाडण्यात आल्या. बांदिवली हिल रस्त्याजवळील ‘रेहान टॉवर’ इमारतीतील बेकायदा बांधकामावरही कारवाई झाली.  

अंधेरी परिसरातील वर्सोवा गावठाणामध्ये सुमारे तीन हजार चौरस फुटांच्या जागेवर तीन मजली बेकायदा इमारत बांधण्यात आली होती. खाडी परिसरालगतच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या सुमारे आठ हजार ५०० चौरस फूट जागेवरही चार ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू होती. त्यात व्यावसायिक गाळे बांधले जात होते. सुमारे ११ हजार ५०० चौरस फूट जागेवर बांधकाम केले जात होते. तिथे पाच बेकायदा इमारती उभारण्यात आल्या होत्या. पालिकेने त्या पाडल्या. कारवाईत बांदिवली हिल मार्गाजवळ मिना इंटरनॅशनल हॉटेलच्या जवळ रेहान टॉवरमध्ये दुसऱ्या मजल्यावरील पोडियमच्या जागेतील ४५० चौरस फुटांची एक सदनिका तोडण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.