गोरेगावमधील आगीचे पाच बळी 

गोरेगावमधील आगीचे पाच बळी 

मुंबई - दोन दिवसांपूर्वी गोरेगावच्या टेक्‍निक प्लस या व्यावसायिक इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती. या दुर्घटनेतील आणखी एका कामगाराचा मृतदेह आज सापडला. त्याचे नाव अब्दुल राकिब खान (23) असे आहे. आगीच्या वेळी त्याला बाहेर पडता आले नव्हते. अब्दुलने त्याच्या मोबाईलवरून भावाला मेसेज पाठवला होता. आग मोठी असून मला वाचता येणार नाही, असे त्यात नमूद केले होते. 

टेक्‍निक प्लस इमारतीला रविवारी (ता. 27) आग लागली होती. या दुर्घटनेत शमशाद शहा, नईमुद्दीन शहा, राम अवतार आणि राम तीर्थपाल या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले होते; मात्र अब्दुलचा मृतदेह सापडला नव्हता. सातव्या मजल्यावरील इलेक्‍ट्रिक पॅनलमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर मंगळवारी अग्निशमन दलाने शोध घेऊन अब्दुलचा मृतदेह बाहेर काढला. आगीच्या वेळी अब्दुलने त्याच्या मोबाईलवरून भावाला मेसेज पाठवला होता. "आग मोठी असून आता वाचणार नाही' असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. 

आगीतून वाचण्याकरता तो इलेक्‍ट्रिक पॅनलमध्ये लपला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आगप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी कंपनीच्या मालकासह दोन कंत्राटदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्या तिघांनाही न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com