विमानतळावर परदेशी चलन जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - दुबईला जाणाऱ्या रमणलाल कालाभाई वाघेला या प्रवाशाकडून 30 लाख 77 हजारांचे परदेशी चलन हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) जप्त केले. त्याच्याविरोधात सीमाशुल्क कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. दुबईला जाण्यासाठी वाघेला रविवारी (ता. 22) सहार विमानतळावर आला होता. "एआययू'च्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी वाघेलाच्या बॅगेची झडती घेतली. तेव्हा त्यात 30 लाख 77 हजारांचे परदेशी चलन ऍल्युमिनिअमच्या फॉइलमध्ये लपवल्याचे आढळले. चौकशीत तो चलनाबाबत माहिती देऊ शकला नाही.
Web Title: foreign currency seized on airpport