दीड कोटींच्या ड्रग्ससह परदेशी महिलेला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

मुंबई - मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) केलेल्या कारवाईत दीड कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह एका महिलेला पकडले. तिच्याकडून 4.9 किलो वजनाचे मिथॅक्‍यूलोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. वेनेसा दे कोक असे या महिलेचे नाव असून, ती दक्षिण आफ्रिकेच्या पारपत्रासोबत प्रवास करत होती. 

केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) यांनी दिलेल्या माहितीवरून एआययूने ही कारवाई केली. ही महिला युथोपियन एअरवेजमधील अदिस अबाबा येथे जाण्यास निघाली होती. त्या वेळी तिच्याकडील बॅगांच्या तपासणीत 10 कार्डबोर्डच्या पाकिटांमध्ये हे अमली पदार्थ सापडले. सलवार सुटच्या कपड्यांमध्ये ही पाकिटे लपवण्यात आली होती. आरोपी महिलेला एनसीबीच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Web Title: Foreign woman with a half-million drug arrests

टॅग्स