उमेदवारी अर्ज मागे घेणे धक्का नाही, धक्का तर निकालाच्या दिवशी बसतो - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

मुंबई : उमेदवारी अर्ज मागे घेणे हा धक्का नसतो, खरा धक्का तर निकालाच्या दिवशी असतो अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांनी घेतलेल्या माघारी संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर करून माझ्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठचे आहे, आम्ही ती जिंकूच, मतांची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादी-काँग्रेस जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, रमेश कराडांना आम्ही पक्षात घेऊन अस काय झालं की त्यांनी माघार घेतली ? याच तेच उत्तर देऊ शकतील.माझ्या दृष्टीने आता ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठची आहे, आम्ही ती जिंकूच. मतांची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादी-काँग्रेस जिंकेल. स्वतःच उमेदवारी मागायची, स्वतःच अर्ज काढून घ्यायचा, पहिल्या दिवसापासून हे काही षडयंत्र होते का? याबद्दल मी आताच बोलणार नाही. खरा धक्का निकालाच्या दिवशी असेल असे ही  धनंजय मुंडे म्हणाले.

रमेश कराड यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतले, उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यावर माणसावर निराशा येते त्यातून ते बोलत असावेत असे सांगतानाच जगदाळे यांना ताकदीने निवडून आणू, मतांच्या आकडेवारीने आम्हीच जिंकू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: form taking back is not shock but shock on result day says dhananjay munde