गोवंडीत माजी नगरसेविकेची आत्महत्या 

गोवंडीत माजी नगरसेविकेची आत्महत्या 

मुंबई - मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका नूरजहॉं रफीक शेख (वय 40) यांनी सोमवारी (ता. 2) सकाळी गोवंडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 137 मधून त्या समाजवादी पक्षाकडून सलग दोनदा निवडून आल्या होत्या. संजयनगर भागात त्या राहत होत्या. सोमवारी सकाळी 8.30 वाजता बंद खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांना मुलांनी पाहिले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com