बोर्डी- मोफत वैद्यकीय शिबीरात 200 रुग्णांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

बोर्डी- बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि नवी मुंबई येथील डॉ. जी.डी. पोळ फाउंडेशन संचलीत वाय.एम.टी.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डी येथे आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबीरात दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली.

डॉ. संजीव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य परिचारिका प्रितल प्रदिप सावे यांच्या देखरेखीखाली डॉ,मिनल वैद्य, डॉ, मंगेश पाटील, डॉ.अमित चव्हाण, डॉ. अभिजीत घाडगे, डॉ. अक्षता घाडगे, डॉ.सायली सदगुणे, डॉ. शिल्पक सदगुणे यांनी रुग्णांना तपासले. पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका पाटील, उपाधक्षा वासंती बर्वे, सचिव रंजना राऊत तात्कालीन अध्यक्षा मालती चुरी, सल्लागार सदस्या शारदा पाटील, नलिनी चुरी,कार्यकारी संचालीका वसुधा चुरी, सुनीता पाटील,रश्मी राऊत,,दिपा पाटील, प्रज्ञा सावे,योगिता म्हात्रे,गुलाब ठाकरे,तरुला माह्यावंशी,मनीषा राऊत, अचला सावे, निता सावे, मिनल राऊत, पुजा वर्तक, अंजली सावे, अर्चना राऊत, रजनी पाटील, संदीप चुरमुरे, अलका सावे, मनिषा पाटील आदी महिलांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: free health check up camp at bordi village