आघाडीनंतरही  मैत्रीपूर्ण लढती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

ठाणे - ठाणे पालिकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन (गवई गट)ची आघाडी झाल्याची घोषणा शुक्रवारी दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे आघाडी झाली असली तरी कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील १५ ठिकाणी दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या शहर अध्यक्षांनी सांगितले.

ठाणे - ठाणे पालिकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन (गवई गट)ची आघाडी झाल्याची घोषणा शुक्रवारी दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे आघाडी झाली असली तरी कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील १५ ठिकाणी दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या शहर अध्यक्षांनी सांगितले.

काही दिवसांपासून ठाणे पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार की नाही, याविषयी चर्चा सुरू हेती. या विषयावरून दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत होत नव्हते. अखेर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव मंजूर करून आघाडीवर दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. याची औपचारिक घोषणा शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष व खासदार आनंद परांजपे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे, बाळकृष्ण पूर्णेकर, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. मनोज शिंदे म्हणाले, ‘ठाणे पालिकेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ८७ जागांवर आणि काँग्रेस ५२ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यात १५ ठिकाणी दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत न झाल्याने दोघांनीही आपापले उमेदवार उभे केले आहेत. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहोत.’ २५ वर्षांत ठाणे पालिकेत कोणताही विकास झाला नाही. जो काही विकास झाला आहे तो आघाडी सरकारने निधी दिल्याने झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. या वेळी रिपब्लिकन (गवई गट)नेही दोन्ही काँग्रेसच्या आघाडीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

शिवसेनाच मुख्य प्रतिस्पर्धी आहे. ठाण्यातील नागरिकांनी त्यांना सत्ता दिली; पण त्याचा दुरुपयोग केला. यंदा परिवर्तनाच्या दिशेने पाऊल म्हणून आम्ही ही आघाडी करत आहोत.
- आनंद परांजपे,शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी

मुंबई

मुंबई : प्रदूषण नियंत्रण आणण्याचे आव्हान खूप मोठे आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न...

02.48 PM

कल्याण : दोन दिवसानंतर गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्यापूर्वी डोंबिवलीकराना डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकपरिसरमधून केडीएमटी...

02.39 PM

कल्याण : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावंर येऊन ठेपले  असल्याने सर्वत्र  उत्साह ओसांडून वाहात आहे. त्यात...

01.57 PM