नायर रुग्णालयात "सलाईन'मध्ये बुरशी! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी सलाईनच्या बाटलीत बुरशी सापडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सलाईन रुग्णाला लावण्यापूर्वीच परिचारिकेच्या ते लक्षात आल्याने रुग्णावरचा धोका टळला. 

मुंबई - मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी सलाईनच्या बाटलीत बुरशी सापडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सलाईन रुग्णाला लावण्यापूर्वीच परिचारिकेच्या ते लक्षात आल्याने रुग्णावरचा धोका टळला. 

वॉर्डमध्ये रुग्णाला सलाईन लावण्यापूर्वी त्यात बुरशी असल्याचे परिचारिकेच्या लक्षात आले. सलाईनच्या बाटलीत पांढरा पदार्थ तरंगत असल्याचे तिने उपस्थित डॉक्‍टरांच्या निदर्शनास आणून दिले. "आम्ही तातडीने संबंधित बॉक्‍समधील सर्वच सलाईन वॉर्डमध्ये पाठवणे थांबवले. अधिक तपासासाठी बुरशी असलेली सलाईनची बाटली तपासणीसाठी पाठवण्यात आली,' अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेतील अहवालानंतरच सलाईनच्या बाटलीतील पदार्थाबाबत नेमकी माहिती मिळेल, असेही डॉ. भारमल म्हणाले; मात्र सलाईनच्या बाटल्या कोणत्या कंपनीकडून पुरवल्या गेल्या त्याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. सतर्कतेचा उपाय म्हणून आम्ही त्वरित केईएम आणि टिळक रुग्णालयालाही सलाईनच्या बाटल्या तपासण्याचे निवेदन दिले. सुदैवाने दोन्ही रुग्णालयांच्या तपासणीत कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नाही, अशी माहिती नायर रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली. 

Web Title: Fungi in saline at Nayar Hospital

टॅग्स