बाप्पांच्या भक्तांचेही गो डिजिटल...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

मुंबई -  आतापर्यंत आरतीसंग्रह, मेहंदी-मखराच्या डिझाईनची पुस्तके, पाककला कृतीची पुस्तके आदींना गणेशोत्सवात चांगली मागणी असायची; पण वॉट्‌सऍप अन्‌ फेसबुकच्या जमान्यात ती घटत चालली आहे. स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर मावतील अशा आकारात सहजासहजी उपलब्ध होणारा ऑनलाईन मजकूर, छायाचित्रे आणि व्हिडीओंचा फटका त्यांना बसला आहे. बाप्पाच्या भक्तांनीसुद्धा "गो डिजिटल‘ असे पाऊल उचलल्याने त्यांचा छापील पुस्तकांकडचा ओढा थोडा कमी झाल्याचे दिसते. 

गंमत म्हणून काही आठवड्यांपूर्वी एक मेसेज वॉट्‌सऍपवर बराच व्हायरल झाला. तो म्हणजे "हार्डली दोन आठवडे राहिलेत! दास रामाचा वाट पाहे "सजणा‘ असे कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तके द्या‘ असा... पण पुढच्या काही दिवसांत संपूर्ण आरतीसंग्रहच वॉट्‌सऍपवर फिरू लागला आहे. "सुखकर्ता दुखहर्ता...‘पासून ते अगदी समारोपाच्या "घालीन लोटांगण...‘पर्यंत सगळ्या आरत्या तोंडपाठ होण्यासाठीच जणू त्या वॉट्‌सऍपचा एक भाग झाल्या आहेत. मेसेजच्या शेवटी "आरतीसंग्रह पुढे पाठवायला विसरू नका‘ अशी हमखास टीपदेखील न विसरता लिहिलेली असते. मराठी टायपिंग सुलभ होण्यासाठी गेल्या वर्षभरात झालेल्या प्रयत्नांचाच हा परिणाम आहे. सुलभ टायपिंगमुळेच आणि चांगल्या डेटा कनेक्‍टिव्हिटीमुळे मोठ्या प्रमाणावर माहिती मराठीत व्हायरल होऊ लागली आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनापासून ते अनेक गणपती मंडळांच्या मिरवणुकांच्या निमित्ताने शेअर होणारा मजकूर, छायाचित्रे, व्हिडीओ आदींमधून त्याचा प्रत्यय यंदा येत आहे. "सबकुछ वॉट्‌सऍप‘ हे देवाणघेवाणाचे सोपे माध्यम झाले आहे. त्याचा फायदा मोठमोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आयोजकही घेत आहेत. अगदी मेहंदीच्या डिझाईनपासून एखाद्या चॅनेल किंवा फेसबुकवर पाहिलेला व्हिडीओही तत्काळ व्हायरल होतो आणि त्याची उपयुक्तता ग्राहकांना अधिकाधिक भावते हीच कमाल वॉटस्‌ऍप माध्यमाने केली आहे.

Web Title: Ganesha's devotees Go Digital ...