बार्जवरील वायुगळतीमुळे तीन खलाशांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मुंबईच्या किनाऱ्यापासून साडेचार सागरी मैलांवर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मंगेश भोसले (27), जयंत चौधरी (23) आणि क्रितीक कोच (27) या खलाशांचा मृत्यू झाला. गणेश बिट्टा (40) आणि मोहम्मद दाऊद इब्राहिम कुरेय (50) यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मुंबई - मुंबईजवळच्या समुद्रात ओरियन-2 या धान्यवाहू बार्जमध्ये शुक्रवारी रात्री (ता. 10) वायुगळती झाल्याने तीन खलाशांचा गुदमरून मृत्यू झाला; तर दोघांना तटरक्षक दलाने वाचवले. 

मुंबईच्या किनाऱ्यापासून साडेचार सागरी मैलांवर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मंगेश भोसले (27), जयंत चौधरी (23) आणि क्रितीक कोच (27) या खलाशांचा मृत्यू झाला. गणेश बिट्टा (40) आणि मोहम्मद दाऊद इब्राहिम कुरेय (50) यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ओरियन-2 या बार्जवर वायुगळती झाल्याने खलाशी अत्यवस्थ असल्याची माहिती शुक्रवारी रात्री साडेदहाला तटरक्षक दलाला मिळाली. तटरक्षक दलाच्या सी-154 जहाज बचावकार्यासाठी दुर्घटनास्थळी रवाना झाले. बार्जच्या तपासणीत सांडपाण्याच्या टाकीतून वायुगळती झाल्याचे निदर्शनास आले. वायुगळती झाल्यामुळे बार्जवरील चार खलाशांनी समुद्रात उड्या मारून स्वतःला वाचवले; परंतु पाच जण बार्जवरच बेशुद्ध पडले. त्यापैकी तिघांचा तेथेच मृत्यू झाला. उर्वरित दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स

मुंबई

मुंबई - अकार्यक्षम ठरलेल्या "बेस्ट'च्या 550 बस वर्षभरात भंगारात काढल्यानंतर आता 453 बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट...

04.24 AM

नवी मुंबई  - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांत जास्त प्रदूषित हवा असणाऱ्या 17 शहरांची यादी जाहीर केली...

03.42 AM

मुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात "स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र...

02.48 AM