पालघर - वाड्यातील चेंदवली गावात गॅस्ट्रोची साथ 

gastro
gastro

वाडा : वाडा तालुक्यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यातील सुमारे 35 नागरिकांना गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली आहे. यातील गिरिजा दांडेकर (वय 65) ही महिला दगावली असून दिपीका कामडी या महिलेची प्रकृती गंभीर आहे.त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुषित पाणी प्यायल्याने ही साथ उद्भभल्याचा ग्रामस्थांचा आरोपआहे. गेल्या दोन दिवसापासून ही साथ आली आहे. 

दिपीका कामडी (वय 28) ही महिला गंभीर असून तिच्यावर ठाणे येथील सामान्य रुग्णालयात, कविता टोकरे (24), निर्मला बोडेॅ (50), जानकी गावंडा (75), सुरेखा ओसवाला (35), सुरेखा गावीत (23), संगिता टोकरे (35), सुनिता दांडेकर (32), देवनाथ खरपडे (30), उमेश पाटील (30), दशरथ वांगड (45), वनिता टोकरे (45), भगवान टोकरे (23), साईनाथ टोकरे (13) अजित कुंभा (11) यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात, ममता टोकरे (17), यशवदा टोकरे (27) यांच्यावर कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरितांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

मिळालेल्या माहितीवरून, वाडा तालुक्यात चेंदवली हे गाव असून त्या गावाला वांगडपाडा , टोकरेपाडा व डोंगरपाडा हे तीन पाडे आहेत.या पाड्यांना पाणी पुरवठा करणारी एक विहीर आहे. या विहीरीचे पाणी पिण्यासाठी व इतर कामासाठी नागरिक वापर करतात. या विहिरीतील पाणी प्यायल्याने नागरिकांना पोटदुखी, जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागला.सर्व प्रथम गिरीजा दांडेकर हिला हा त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिच्यावर उपचार सुरू असतानाच 3 मे रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला. तर सायंकाळी एक एक रूग्ण रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी दिपीका कामडी हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. 

तिन्ही पाड्यांना या एकाच विहीरीतून पाणी पुरवठा केला जातो. ही विहीर गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छ करण्यात आलेली नाही. तिच्यात गाळ साचला आहे. त्यामुळे तिचे पाणी दुषित झाले आहे.असा आरोप ग्रामस्थ रावजी टोकरे व अजय डोंगरकर यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळेच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगून तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

दुषितअन्न खाल्यामुळे किंवा दुषित पाणी प्यायल्याने हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
- डॉ.प्रदीप जाधव ,वैद्यकीय अधिकारी, वाडा ग्रामीण रुग्णालय 

चेंदवली गावात आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून तिथेच रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुषित अन्न खाल्यामुळे ही घटना घडली असावी कारण लहान मुलांना याचा त्रास झालेला नाही. 
- डॉ. डी.डी.सोनावणे, तालुका आरोग्य अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com