मुंबईत गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

गीता गवळींच्या पाठिंब्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढले असून महापौरपदावर दावा सांगण्यासाठी भाजपला आणखी बळ मिळाले असल्याचे मानले जात आहे.

मुंबई : अरुण गवळीची मुलगी व अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. स्थायी समितीमध्ये सदस्य आणि आरोग्य विभागाचे सभापती करण्याचे आश्वासन भाजपने दिल्याने गवळी यांनी पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. 

शिवसेना आणि भाजप महापौरपदासाठी संख्याबळाची जमवाजमव करीत असून, एकूण 14 अपक्ष नगरसेवकांपैकी जास्त नगरसेवकांना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होत असताना अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. गीता गवळींच्या पाठिंब्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढले असून महापौरपदावर दावा सांगण्यासाठी भाजपला आणखी बळ मिळाले असल्याचे मानले जात आहे.

शिवसेना भवनात गुरुवारी हजेरी लावल्याने गीता गवळी या सेनेला पाठिंबा जाहीर करतील असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र गीता गवळी आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्या चर्चेतून काही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी दबाव तंत्र वापरल्यामुळे गवळी यांनी सेनेसोबत न जाता भाजपची साथ देण्याचे ठरविले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. गवळी या आज (शुक्रवार) कोकण भवनात जाऊन गटनोंदणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 

मुंबई

कल्याण : रस्त्यात येणाऱ्या प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत कल्याण डोंबिवली...

06.45 PM

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या रस्ता रुंदीकरण तसेच अन्य विकास प्रकल्पातील बाधितांसाठी पुनर्वसन धोरण ठरवण्यात येत आहे. मात्र...

06.24 PM

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व...

05.48 AM