मिरा-भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

माननीय शिवसेनापक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रभावित होऊन मिरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांनी मातोश्री येथे उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

मीरा भाईंदर (मुंबई) : माननीय शिवसेनापक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रभावित होऊन मिरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांनी मातोश्री येथे उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी मा.मेंडोसा यांबरोबर माजी महापौर कॅथलीन परेरा, नगरसेवक बेन्चर मेंडोसा, बर्नाल्ड डिमेलो, भगवती शर्मा, माजी नगरसेवक हेलन जार्जी, गोविंद जार्जी, नर्मदा वैती यांनीही शिवसेनापक्ष प्रवेश केला. त्याप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री मा.एकनाथजी शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, रवींद्र फाटक, युवासेना सचिव पुर्वेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.