नवजात मुलीची आईकडून हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

कल्याण - दोन अपत्यांनंतर झालेल्या तिसऱ्या मुलीच्या गळ्याला नख लावून आईनेच तिची हत्या केली. कल्याणमधील उंबर्डे परिसरात ही धक्कादायक घटना घडली. वैशाली प्रधान असे आरोपी महिलेचे नाव असून खडकपाडा पोलिसांनी तिला अटक केली. वैशालीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिसऱ्यांदा ती गर्भवती राहिली. मात्र, सासूला हे मूल नको होते. यामुळे तिने गर्भपात करण्यासाठी वैशालीला पैसे दिले. नवऱ्याने ते पैसे दारू पिण्यासाठी खर्च केले. वैशालीची सातव्या महिन्यात प्रसूती झाली आणि तिला तिसरी मुलगी झाली. दारूडा पती आणि हलाखीची परिस्थिती यामुळे दोन मुलींचे पालन करणे शक्‍य नसल्याचे वाटल्याने तिने नवजात मुलीची हत्या केली. सातव्या महिन्यात मुलगी जन्मल्याने तिच्या जगण्याची शक्‍यता नव्हती, असे तिने पोलिसांना सांगितले.
Web Title: girl born baby murder by mother crime