सोने आयातीत बॅंकांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - तीन बॅंकांचे 1 हजार 530 कोटींचे नुकसान केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबईतील दोन सराफ कंपन्यांविरोधात बुधवारी फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल केले. कंपनीच्या मुख्य प्रवर्तक व इतर व्यक्तींविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे "सीबीआय'च्या वतीने सांगण्यात आले. 

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय व विजया बॅंकेने केलेल्या तक्रारींनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. सोन्याच्या आयातीबाबत झालेल्या गैरव्यवहारांमुळे सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला दोन प्रकरणांत अनुक्रमे 699 कोटी 54 लाख आणि 255 कोटी 24 लाख रुपये, आयडीबीआयला दोन प्रकरणांत अनुक्रमे 133 कोटी 12 लाख व 55 कोटी 68 लाख; तसेच विजया बॅंकेला 233 कोटी 15 लाख व 153 कोटी 71 लाख रुपये परकी बॅंकांना द्यावे लागले. या तीन बॅंकांचे सुमारे 1 हजार 530 कोटींचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.