पावणेदोन कोटीचे सोने विमानतळावर जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - हवाई गुप्तवार्ता कक्षाने (एआययू) 21 प्रवाशांना अटक करून त्यांच्याकडून पावणेदोन कोटीचे सोने जप्त केले. अटक केलेले सर्व जण उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्याकडे सोन्याच्या 112 लडी सापडल्या.

मुंबई - हवाई गुप्तवार्ता कक्षाने (एआययू) 21 प्रवाशांना अटक करून त्यांच्याकडून पावणेदोन कोटीचे सोने जप्त केले. अटक केलेले सर्व जण उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्याकडे सोन्याच्या 112 लडी सापडल्या.
सोमवारी पहाटे हे सर्व प्रवासी जेद्दाह येथून मुंबई विमानतळावर उतरले होते. त्यांच्याकडील पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या खाली व बाटलीच्या खाली या छोट्या लगडी चिकटवण्यात आल्या होत्या. हे प्रवासी रामपूर जिल्ह्यातील तांडा गावातील आहेत. लखनौमधील तस्करांच्या ते संपर्कात होते. या प्रवाशांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.