येना येना चिऊताई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

ठाणे - शहरात उभारलेल्या टोलेजंग इमारतींच्या परिसरातून स्थलांतरित होणाऱ्या चिमण्यांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी आणण्यासाठी ठाण्यातील बड्या गृहसंकुलांनी पुढाकार घेतला आहे. महिनाभरापासून शहरातील वेगवेगळ्या गृहसंकुलांत त्यासाठी आवश्‍यक खाद्यपुरवठा घरट्यांची व्यवस्था करण्यात येत असून आत्तापर्यंत दीडशेहून अधिक घरटी लावण्यात आली आहेत. चिमणी दिवसाच्या दिवशी या नागरिकांकडून शंभरहून अधिक खाद्यपुरवठा घरट्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ठाणे सिटिझन व्हाईस संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम होत असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

वाढत्या शहरीकरणामुळे टोलेजंग इमारतींनी मोक्‍याच्या जागा पटकावल्या असून हिरवळ नष्ट झाली आहे. चिमण्यांचे होणारे स्थलांतर आणि त्यांचे या भागातील कमी होणारे अस्तित्व टिकवण्यासाठी सिटिझन फाऊंडेशन संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या माध्यमातून शहरातील सर्व उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांना खाद्यपुरवठा घरटी बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 150 हून अधिक घरटी बसवण्यात आली आहेत; तर चिमणी दिवसाच्या दिवशी 100 खाद्यपुरवठा घरटी बसवण्यात येणार असून त्यांनतर हळूहळू ही संख्या वाढवण्याकडे भर दिला जाणार आहे, अशी माहिती संस्थेने दिली आहे. 

चिमणी दिनी विशेष मोहीम 
ठाण्यातील वेदांत, निळकंठ, लक्ष्मीनारायण, वसंतविहार, सिद्धांचल, रौन्नक, प्रेस्टीज सोसायटी, विम्बल्डन अशा वेगवेगळ्या गृहसंकुलांत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रामुख्याने चिमण्यांची जास्त संख्या असलेल्या भागात ही खाद्यपुरवठा घरटी बसवण्यात येणार आहेत. चिमण्यांना त्याचा फायदा होऊ शकेल, अशी माहिती ठाणे सिटिझन फाऊंडेशनचे कॅसबर ऑगस्ट्रीन यांनी दिली. 

Web Title: grahsankul will supply food