उत्स्फूर्त प्रतिसादात मुंबईत द्राक्ष महोत्सवाची सांगता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

मुंबई - सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षाचे मुंबईत ब्रॅंडिंग व्हावे, या उद्देशाने मनोरा आमदार निवास परिसरात द्राक्षभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित द्राक्ष महोत्सवास मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चार दिवस चाललेल्या या महोत्सवास राज्यभरातून 100 हून अधिक आमदार व 20 हजारांहून अधिक मुंबईकरांनी भेट दिली. 

उत्तम प्रतीची द्राक्षे या प्रदर्शनात मांडण्यात आली. शिवाय राज्यभरात उत्पादित होणाऱ्या द्राक्षांच्या विविध जातींची माहिती व वैशिष्ट्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली. आज या महोत्सवाची सांगता आमदार अनिल बाबर, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, बंडोपंत राजोपाध्ये, संतोष भिंगारदेवे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 

या द्राक्ष महोत्सवात सोनाका, सुपरसोनाका, माणिक चमन, शरद सिडलेस, जम्बो सिडलेस या जातींची द्राक्षे ठेवली होती. मुंबईत प्रथमच अशा प्रकारचा द्राक्ष महोत्सव संपन्न झाला. समारोपादिवशी कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, अमित घोडा, बाळासाहेब पाटील, ख्वाजा बेग, संजीव रेड्डी बोदकुरवार, शांताराम मोरे, मिलिंद माने, भीमराव तापकीर, बाळा भेगडे आदी सदस्यांनी भेट देऊन मुंबईत प्रथमच आयोजित केलेल्या द्राक्षमहोत्सवाचे कौतुक केले.