राष्ट्रवादी गुजरातेत भाजपविरुद्ध लढणार- शरद पवार

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

गुजरातेत भाजपकडून सत्ता, पैशाचा वापर

मुंबई : 'गुजरातेत आम्ही भाजपाच्या विरुद्ध लढू. काँग्रेससोबत आम्ही आघाडी करून काही जागा लढवू, असे जाहीर करताना सध्या आमच्याकडे विधानसभेच्या दोन जागा आहेत,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई येथील टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन द्वारा आयोजीत 'आम्ही कृतज्ञ आहोत' या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानण्यात आले. पवार यांनी केलेल्या मदतीमुळे टीव्ही पत्रकारांसाठी येथील कार्यालय वास्तुसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आयोजित कृतज्ञता कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली. व्यासपीठावर आमदार जितेंद्र आव्हाड, टीजेएचे अध्यक्ष विमल सिंग, महासचिव विलास आठवले, उपाध्यक्ष अतुल कदम उपस्थित होते.

पत्रकारांची जमात ही 'भटक्यांची' असून, त्यांच्याबद्दल मला अत्यंत आत्मीयता आहे. महाराष्ट्रात पत्रकारांनी गंभीरतेने आणि अभ्यासू वृत्तीने पत्रकारीता करावी असा सल्ला  पवार यांनी यावेळी दिला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :