हॅकर मनीष भंगाळेचा पुन्हा जामिनासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई - माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेचा जामीन अर्ज मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी फेटाळला होता. यामुळे भंगाळे याने आता मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

याप्रकरणी झालेले आरोप अतिशय गंभीर असून, तपासही अजून अपूर्णावस्थेत असल्याने जामीन देता येणार नाही, असे दंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. गुन्हे शाखेने मागील आठवड्यात भंगाळे याला अटक केली होती. दाऊदच्या पाकिस्तानातील निवासस्थानी असलेल्या दूरध्वनी क्रमांकाची देयके सेवा पुरवठादार कंपनीच्या संकेतस्थळावरून हॅक केल्याचा दावा भंगाळेने केला होता. दाऊदच्या घरातून एकनाथ खडसे यांना कॉल आल्याचा आरोपही त्याने केला होता.