हार्बर मार्गावर विशेष घातपात तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

वडाळा - रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस अपघात घडवून आणण्यासाठी समाजकंटक रेल्वे रुळाला लक्ष्य करीत आहेत. या समाजकंटकांना आवर घालण्यासाठी व येणाऱ्या धमक्‍यांच्या अनुषंगाने मुंबईतील सर्वच रेल्वेस्थानकांवर रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. ४) हार्बर मार्गावरील रे रोड व डॉकयार्ड स्थानकात विशेष घातपातविरोधी तपासणी करण्यात आली.

वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय घाटकोपर येथील बीडीडीएस तंत्र पथक व डॉग स्कॉड पथक हिरा डॉगच्या साह्याने रेल्वेस्थानकावरील अडगळीच्या जागा, तिकीट बुकिंग ऑफिस, पादचारी पुलाखालील जागा तसेच स्थानकातील कानाकोपऱ्यांची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. या तपासणीत काहीही आक्षेपार्ह मिळून आलेले नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. तपासणीमध्ये डॉग हॅंडलर सागर धनकुटे, तांत्रिक पोलिस नाईक सतीश जाधव, ॲलेक्‍स अलझेंडे यांनी तपासणी केली. सोबत वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे हवालदार मंगेश साळवी, मनोज गुजर, पोलिस शिपाई मुकुंद कोकणे आदी सहभागी झाले होते.