हेमा मालिनी यांनी नाकारला भूखंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई - संस्थेला नृत्य अकादमीसाठी सरकारने नाममात्र दरात दिलेला अंधेरी येथील भूखंड अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी नाकारला आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

मुंबई - संस्थेला नृत्य अकादमीसाठी सरकारने नाममात्र दरात दिलेला अंधेरी येथील भूखंड अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी नाकारला आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

पत्रकार केतन तिरोडकर यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जनहित याचिका केली आहे. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. हेमा मालिनी यांना दिलेला भूखंड त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे याचिकादाराने केलेल्या आरोपांत तथ्य नाही, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. भूखंड न घेतल्यामुळे याचिका निकाली काढत आहोत. मात्र, याचिकादाराला आवश्‍यकता वाटल्यास भविष्यात ते नवीन याचिका करू शकतात, अशी मुभा खंडपीठाने दिली आहे.

हेमा मालिनी यांना तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अंधेरी येथे सुमारे दोन हजार चौरस मीटर भूखंड अत्यंत कमी दरात म्हणजे अवघ्या 70 हजार रुपयांत दिला होता. या भूखंडावरील उद्यानाचे आरक्षणही गैरप्रकारे उठविण्यात आले आहे, असा याचिकादाराचा आरोप होता.

मुंबई

कल्याण : गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ मोठ्या प्रमाणात महाप्रसाद ठेवतात. यावेळी नागरिकांच्या आरोग्याला घातक...

03.36 PM

सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून...

03.12 PM

ठाणे : सकाळपासुन कोसळत असलेल्या श्रावणसरींनी ठाणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटनांसह वृक्ष उन्मळून...

01.03 PM