शेतकरी मारहाणी प्रकरणी उच्चस्तरीय समिती

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 24 मार्च 2017

ते पुढे म्हणाले, "कालच्या मंत्रालयातील घटनेत सदर शेतकऱ्याने माध्यमांना पोलिसांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांना त्याने चावा घेतल्याने त्याला इजा झाली आहे.

मुंबई : मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यास आलेल्या शेतकऱ्याला मारहाणीसंदर्भात, तसेच या संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात चौकशी करून संपूर्ण अहवाल मला अवगत करण्यात यावा, असे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी मारहाणीप्रकणी निवेदन केले आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
"औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे हा काल दिनांक 23 मार्च रोजी दुपारच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आला होता. 11 व 12 एप्रिल रोजी झालेल्या गारपिटीत त्याने स्वखर्चातून उभारलेल्या शेडनेट व पॉली हाऊसच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी त्याने स्थानिक कृषी विभागाकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, नैसर्गिक आपत्तीत दिली जाणारी मदत ही फक्त पिकांसाठी दिली जाते असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, "पुढच्या वर्षासाठी या शेतकऱ्याला शासकीय योजनेतून नेटशेडसाठी अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार डिसेंबर, 2016 मध्ये त्याची निवड होऊन वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र, आर्थिक अडचणीचे कारण देत त्याने ही संधी वापरली नाही. त्याला बँकेतून कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. मात्र, बँकेने 25 टक्के रक्कम भरण्यास सांगितल्याने त्याने पुन्हा आपणांकडे पैसे नाहीत असा पवित्रा घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, "कालच्या मंत्रालयातील घटनेत सदर शेतकऱ्याने माध्यमांना पोलिसांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांना त्याने चावा घेतल्याने त्याला इजा झाली आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे.

Web Title: high level committee on farmer beating case