डोंबिवलीमध्ये हिंदू साम्राज्य दिन दिन उत्साहात साजरा

dombivali
dombivali

डोंबिवली - शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते ज्यांनी समाजातील सर्व जातीच्या लोकांना एकत्र बरोबर घेऊन हिंदू साम्राज्य निर्माण करण्यासाठी जिंके पर्यंत लढा देण्याची जिद्द निर्माण केली. जन्म व मृत्यू कोणाच्याही हातात नसतो त्यामुळे जयंती, पुण्यतिथी पेक्षा स्वकर्तुत्वावर प्रबळ मोगलांविरोधात हिंदू साम्राज्य निर्मितीला आधिक महत्त्व आहे. म्हणूनच राजांचा ‘शिवराज्याभिषेक‘ दिन आपण उत्सव स्वरुपात साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे कोकण प्रांत सहकार्यवाह चंदू जोशी यांनी डोंबिवलीत केले. 

सोमवारी सायंकाळी मानपाडा पथ येथील छत्रपती शिवाजी महाराज पूतळा येथे ‘“हिंदू साम्राज्य दिन“ सोहळ्यानिमित्त घोष पथकाकडून वादन करुन मानवंदना व पूजनाचा कार्यक्रम तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कार्यवाह अतुल भावे, स्थायी समिती सभापती राहुल दामले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, गणेश धारगळकर आदि मान्यवर शिवसैनिक, स्वयंसेवक व डोंबिवलीकर मोठया संख्येने उपस्थित होते. 

रविवारी शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत 38 जोड्या स्पर्धकांनी प्रत्यक्ष भाग घेतला. आई - मुलगी, बहीण भाऊ, नवरा बायको अशा जोड्यानी एकत्र येऊन छत्रपतींच्या इतिहासावर प्रश्नपत्रिका सोडविण्याची ही पहिलीच वेळ असावी.बदलापूर येथून आलेली एक स्पर्धक, श्रिया फेगडे हीने राजगड किल्ल्यावर एक सुंदर कविता सादर केली. या स्पर्धेत शौनक पिम्पुटकर व प्रथमेश बिवलकर प्रथम पारि तर द्वितीय पारितोषिक वेदांत जोशी - उर्वी क्षीरसागर आणि सुखदा रावदेव आणि प्रशांत रावदेव या जोडीला विभागून देण्यात आले. तृतीय पारितोषिक मयुरेश साठे आणि विवेक ताम्हणकर यांना मिळाले. 

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डोंबिवली शहराच्या वतीने करण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com