ऐतिहासिक टाऊन हॉल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

ठाणे - ठाणे शहराच्या मध्यभागी असलेला "टाऊन हॉल' ऐतिहासिक ही वास्तू आहे. शहराच्या सांस्कृतिक कारकिर्दीची ही वास्तू साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधण्यात आलेली ही वास्तू बरीच जीर्ण झाली होती. सप्टेंबर 2015 मध्ये त्या वेळचे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या पुढाकाराने तिचे नूतनीकरण झाले. टाऊन हॉल ही वास्तू लहान असली तरी आकर्षक आहे. जुन्या लाकडी बांधकामाचा अप्रतिम नमुना म्हणून ती ओळखली जाते. नूतनीकरणात टाऊन हॉलच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत ऍम्पी थिएटर म्हणजेच खुले व्यासपीठ तयार करण्यात आले असून अनेक दर्जेदार कार्यक्रम इथे होत असतात. 

1928 मध्ये कावसनी दिवेचा या दानशूराने टाऊन हॉल बांधून सरकारकडे सुपूर्द केला होता. शहरातील नागरिक आणि संस्थांना अत्यल्प दरामध्ये सभागृह मिळावे हा त्याचा मुख्य उद्देश होता. इथे काही प्रमाणात राजकीय सभासुद्धा होत. स्वातंत्र्यपूर्व काळात याच उद्देशासाठी वापरली जाणारी ही वास्तू स्वातंत्र्यानंतर काही काळ स्वस्त धान्यदुकान, सरकारी गोदाम म्हणून वापरली जाऊ लागली. मात्र ठाण्याचे ज्येष्ठ नागरिक स. पा. जोशी यांच्या प्रयत्नामुळे यातून तिची सुटका झाली. टाऊन हॉलच्या आवारात ठाण्यामध्ये सापडलेली पुरातन ब्रह्माची मूर्तीसुद्धा आहे.

टॅग्स