अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो - विश्वनाथ महाड़ेश्वर

 दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई : अग्निशी झुंज देत मुंबईकरांच्या जीवन व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाड़ेश्वर यांनी अग्निशमन दलात नव्यानेच सामिल झालेल्या मिनी फायर इंजिन आणि कंट्रोल पोस्टचे लोकार्पण समयी म्हटले.

मुंबई : अग्निशी झुंज देत मुंबईकरांच्या जीवन व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाड़ेश्वर यांनी अग्निशमन दलात नव्यानेच सामिल झालेल्या मिनी फायर इंजिन आणि कंट्रोल पोस्टचे लोकार्पण समयी म्हटले.

सेनापतीने दिलेला आदेश पाळणे हे आपले पहिले कर्तव्य असल्याचे सैनिक म्हणतात. नाही अथवा का? असा प्रतिप्रश्न न विचारता कर्तव्य पार पाडणे हेच सैनिकांना ठाऊक असते असेही पुढे महापौर म्हणाले.काल (ता. 23) भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात वार्षिक अग्निशमन कवायत आणि क्रीड़ा स्पर्धा संपन्न झाल्या. मुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त ए.एल.जराड, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाड़ेश्वर, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा स्मिता गावकर,नगरसेवक रईस शेख,चीफ फायर ऑफिसर प्रभात रहांगदळे, उपायुक्त रामभाऊ धस यांचेसह मोठ्या संख्येने अग्निशमन अधिकारी, जवान उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डी.एस.पाटील (ADFO), आर.वी.मोरे(SO) आणि एस.एन. आमकर(ASO) यांनी केले.स्पर्धेनंतर विजयी टीम्स ना महापौर महाड़ेश्वर यांनी गौरविले.

दिंडोशी, बोरीवली, वडाला, मुलुंड आणि भायखळा या अग्निशमन केंद्रांनी सहभाग घेतला होता.एका ऊंच मनोऱ्यावर शिडीने चढ़त जाऊन आग नियंत्रित करने विझविने हे लक्ष्य मिनिट भरात पार पाडित 100 गुण 
पटकाविने हे मोठे आव्हान पेलन्यास सर्व टीम सज्ज झाल्या होत्या.  

आगीची वर्दी मिळाली आणि तात्काळ जवान धावले. फक्त काही सेकंदांचा शारीरिक आणि मानसिक बल क्षमता तपासण्याचा, शमन - विमोचन करताना साधनांचा उत्तम हाताळण्याचा तसेच जीवन-मृत्यु संघर्षाच्या कसोटीचा क्षण क्षण पुढे जाऊ लागला. प्रेक्षकांच्या छातीत धड़ धड़ वाढू लागली, हॄदयाचे ठोके वाढले आणि लक्ष्याचा वेध घेत काम फत्ते करण्या साठी ते दोघे जवान शिडी वरुन अग्निशमन करिता तिसऱ्या मजल्यावर टारगेटकड़े गेले. तर इतर दोघांनी पाण्याचा कापड़ी पाईप वर पाठवला. त्यास जोडलेल्या वाटर मशीन मधून पाणी सोडण्यात आले. तिसऱ्या मजल्या पर्यंत पाणी पोहचले टारगेटवर फवारुन आग विझविण्यात आली.

अत्यंत चपळतेने आल्यामार्गी शिडीवरुन ते दोघे खाली उतरले आणि जख्मी व्यक्तीला तात्काळ सुरक्षित ठिकाणी आणले.तर इतर तिघा जवानांनी पाईप गुंडाळून आणला.हे सगळे घडले अवघ्या काही मिनिट सेकंदाच्या वेळात.आणि जवानांवर प्रेक्षकांतुन टाळ्यांचा वर्षाव झाला.अग्निशमन दला करिता अत्यंत आधुनिक यंत्रणा पियरसिंग टूल्स हे मशीन आणले आहे.कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त आग विझवीणे हा हेतु असल्याने या मशीन मधून दरवाजा, शटर आतील लागलेली आग शमन करता येते.यात ग्रान्यूअल्स असतात पाण्याचा मारा हा 6 mm ते 9 mm जाडीचा पत्रा,काँक्रीट भेदुन अग्नि शमन करण्यात येते. मिनी फायर मशीनमुळे कमी वेळात कमी पाण्यात जीवित व वित्त हानी रोखली जाते. असे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Web Title: i m proud of fire brigades said by mumbai s mayor vishwanath mahadeshwar