सिडकोच्या विरोधात एल्गार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

तुर्भे - सिडकोच्या विरोधात नवी मुंबईतील झोपडपट्टीवासियांनी एल्गार पुकारला आहे. नुकसानभरपाई आणि हक्काचे भूखंड मिळावेत, या प्रमुख मागण्यांसह इतर अन्य मागणीसाठी वाशी सेक्‍टर 19 मधील एकतानगर आणि ग्रीनपार्क झोपडपट्टीतील रहिवाशांनी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून सिडको भवनसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. "अभी नहीं तो कभी नहीं', असा निर्धार करतानाच या झोपडपट्टीधारकांनी सिडकोला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामियॉं पटेल यांनी सांगितले.

सिडकोने गेल्या महिन्यात कोणतीही पूर्वसूचना न देता एकतानगर आणि ग्रीन पार्कमधील 200 ते 300 झोपड्यांवर पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. त्यामुळे त्यांच्यावर मोलमजुरी करण्याची आणि रस्त्यावर राहण्याची वेळ आली. या कारवाईमुळे त्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच, शिवाय मुलांचे शैक्षणिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे न्यायासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे; मात्र सिडकोने मागण्या मान्य कराव्यात, यासाठी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली चौघे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी शेकडो महिला आणि मुलेही साखळी उपोषणामध्ये सहभागी झाले होते. चॉंद सरदार पठाण, सुलेमान काझी, साहेबराव खंदारे आणि विष्णू कोल्हेकर यांनी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

विशेष म्हणजे, सिडकोने कारवाई केलेल्या झोपड्या 20 वर्षांच्या जुन्या आहेत. त्यांना सिडकोने घरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ होत असल्याने शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाचा...

08.09 AM

पनवेल  -  कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान- चिमण्यांसारख्या मुक्‍या प्राण्यांवरही विपरीत...

06.03 AM

नवी मुंबई - महापालिकेच्या विधी विभागात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक साखळी तयार झाली आहे. ती महापालिकेची लूट करत आहे...

04.33 AM