गरज पडल्यास विनोद खन्नांना अवयवदान करेन- इरफान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र पाहून आपल्याला मोठा धक्का बसला आहे. खन्ना यांना उपचारादरम्यान अवयवाची गरज भासली तर माझ्या शरिरातील अवयवदान करेन, असे अभिनेते इरफान खानने म्हटले आहे.

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र पाहून आपल्याला मोठा धक्का बसला आहे. खन्ना यांना उपचारादरम्यान अवयवाची गरज भासली तर माझ्या शरिरातील अवयवदान करेन, असे अभिनेते इरफान खानने म्हटले आहे.

इरफान खानची भूमिका असलेला 'हिंदी मीडिअम' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी बोलताना इरफान म्हणाला, 'विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र सोशल नेटवर्टींगवर व्हायरल झाले आहे. ते छायाचित्र पाहून मला धक्काच बसला. देवाकडे प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी. त्यांच्यावर उपचार करताना एखाद्या अवयवाची गरज लागली तर माझे अवयव दान करेल.'
 
विनोद खन्नांसाठी माझ्या आयुष्यात एक विशेष जागा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दोन अत्यंत सुंदर हिरो आहेत, त्यातील एक म्हणजे धर्मेद्र व दुसरे विनोद खन्ना. विनोद खन्ना यांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत, असेही इरफान म्हणाला.

दरम्यान, विनोद खन्ना यांचे पुत्र राहुल यांनी सांगितले की, 'बाबांच्या शरिरामधील पाणी कमी झाल्यामुळे उपचारासाठी गिरगावातील एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये शुक्रवारी (ता. 31) रात्री दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती सुधारली असून, डॉक्‍टर लवकरच त्यांना घरी सोडणार आहेत. डॉक्‍टर व हॉस्पिटल कर्मचाऱयांनी त्यांची खूपच चांगल्या प्रकारे काळजी घेतली. याबद्दल मी खूप आभारी आहे. शिवाय, आमचे कुटुंब त्यांची काळजी घेत आहे. त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून अनेकांनी प्रार्थना केली आहे. आमचे कुटुंब सर्वांचे आभारी आहे.'

दरम्यान, आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. विनोद खन्ना यांची प्रकृती चांगल्या प्रकारे सुधारली असून, त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

अभिनेते विनोद खन्ना यांनी 1968 मध्ये 'मन का मीत' या चित्रपटात भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पन केले. 'मेरे अपने', 'कुर्बानी', 'पूरब और पश्‍चिम', 'रेशमा और शेरा', 'हाथ की सफाई', 'हेरा फेरी', 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या. अभिनेता शाहरुख खान व वरुण धवन यांच्यासोबत 'दिलवाले' या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते.

Web Title: if needed I will donate my organs to vinod khanna, saya irfan khan