इमानच्या काही चाचण्या मेलबर्नमध्ये होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - लठ्ठपणावर मुंबईत उपचारांसाठी आलेल्या इजिप्तमधील इमान अहमदच्या काही चाचण्या मेलबर्नमध्ये होणार आहेत. त्यासाठी तिच्या पोटातील चरबी आणि स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सैफी रुग्णालयात उपचार सुरू असताना इमानवर 11 मार्चला एक शस्त्रक्रिया झाली. तिला कोणताही आनुवंशिक आजार असल्यास त्याची माहिती व्हावी, यासाठी आवश्‍यक तपासण्या अद्याप झालेल्या नाहीत.

त्यासाठी काही नमुने मेलबर्नला पाठविण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे 91 नमुने इमानच्या शरीरातून घेण्यात आल्याचे कळते. त्यांच्या तपासण्यांनंतर तिच्या लठ्ठपणाचे नेमके कारण काय हे समोर येईल, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमानच्या आजारासंदर्भात काही तज्ज्ञांबरोबर चर्चा सुरू आहे. त्यांना हे नमुने पाठविण्यात आले आहेत.

इमानवर करण्यात आलेल्या "स्लिव्ह गॅस्ट्रेक्‍टोमी' शस्त्रक्रियेनंतर इमानच्या शरीरातील दोन तृतीयांश पोटाचा भाग कमी करण्यात आला आहे. तिच्यावरील "बेरिऍट्रिक' शस्त्रक्रियेचा हा पहिला टप्पा आहे.

इमान घरी जाणार

इमानवर उपचार सुरू आहेत. ती अजून पूर्ण बरी झालेली नाही. त्यानंतरही काही दिवसांत तिला सैफी रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे समजते. इजिप्तमधील तिच्या घरी प्रकृतीवर डॉक्‍टर लक्ष ठेवणार आहेत. त्यानंतर पुढच्या उपचारांसाठी तिला पुन्हा मुंबईत आणण्यात येणार आहे.

Web Title: iman ahmad test in melborn