भिवंडी - वज्रेश्वरी ते अंबाडी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम 

wajreshwari
wajreshwari

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील चाळीसगांव ते अंबाडी या रस्त्याचे तांत्रिक मान्यता आदेश क्रमांक 60 सन 2017-2018 रा.मा.क्र.81 सा.क्र .34/650 ते 44/150 नुसार सुधारणा व दोन वर्षासाठी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी रु. 3,1894098 इतके अंदाजपत्रक मंजूर झालेले  आहे. 

ऐपीम /कार्पेट /सील कोट ह्याची सक्षम अधिकाऱ्या कडून वेळोवेळी पडताळणी करून घ्यावी असे विविध बाबी आहे . पण प्रत्क्शात  मात्र ह्या सर्व बाबी बाजूस ठेवून फक्त वर वर काम सदर ठेकेदार करत आहेत.

रस्त्याचे काम सलगपणे न करता जिथे जिथे खड्डे पडले आहेत तिथेच डागडुजी स्वरूप नूतनीकरण करण्यात येत आहे व जो रस्ता चांगला आहे त्यावर फक्त सील कोट टाकून लेवल साधण्याचा प्रयत्न करून उर्वरित मटेरियल हडप  करण्याचा  प्रयत्न ठेकेदार उघडपणे करताना दिसत आहे.

अगोदरच रस्त्यावर असलेले खड्डे त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकलेली खडी जी अर्धी रस्त्यावर पसरल्यामुळे वाहनचालक पादचारी ह्यांना प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यात भर म्हणून मागील आठवड्यात सदर रस्त्यावर पडलेल्या खडिवरुन कुडुस येथील दोन तरुण मोटरसायकल स्वाराचा खडिवरून घसरून भीषण अपघात झाला व त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला सदर घटनेमुळे स्थनिक  नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले  आहे.

वज्रेश्वरी येथील कन्याविद्यालय जवळील मोरीजवळ गेल्या एक वर्षापासून 2 फूट रुंद आणि 7 फूट खोल असे मोठे भगदाड पडलेले असून त्यात बरेच मोटरसायकल स्वार, पादचारी पडून गंभीर जखमी झालेले आहेत. 

सदर रस्त्याच्याच  देखभाल आणि दुरुस्ती साठी रु 570000 लाख इतका निधी उपलब्ध झाला होता मग तो गेला कुठे? रस्त्यांची दुरुस्ती तर दूर पण साधे भगदाड ही त्यातून बुजवू शकत नाही का ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते सुनील देवरे यांनी विचारला आहे.

सदर रस्त्याचे नूतनीकरण करत असताना लगेचंच बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले दिसत आहेत. यावरून कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे हे कळते.

ऐन पावसाळा तोंडावर आला असताना अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेला वेठीस धरणाऱ्या या अधिकारी वर्ग आणि ठेकेदार विरुद्ध जनआंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र शाह, सचिन शिंदे, दीपक पुजारीव सुनील देवरे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com