उल्हासनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे उद्घाटन

Inauguration of Dr Babasaheb Ambedkar Study Course at Ulhasnagar
Inauguration of Dr Babasaheb Ambedkar Study Course at Ulhasnagar

उल्हासनगर - महाराष्ट्रातील पहिलीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे आज उद्घाटन करण्यात आले.मात्र ज्यांनी या अभ्यासिकेसाठी पाठपुरावा केला. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत कालावधीत अभ्यासिकेचा भूमिपूजन सोहळा पार पडला, त्यात शिवसेनेच्या माजी महापौर अपेक्षा पाटील, रिपाइं आठवले गटाच्या माजी उपमहापौर पंचशीला पवार यांना उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका पाठवण्याचे साधे सौजन्य पालिकेने दाखवले नाही. मात्र उद्घाटन सोहळ्यात ज्यांनी या अभ्यासिकेसाठी प्रयत्न केले त्यांची नावे घेऊन पोचपावती देण्यात आली.

उल्हासनगरात शिवसेनेची सत्ता आणि आयुक्त मनोहर हिरे, शिक्षण उपायुक्त जमीर लेंगरेकर असताना मनसे सरचिटणीस राजू पाटील, मनवीसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू देशमुख, मनोज शेलार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची संकल्पना मांडून त्यासाठी पाठपुरावा केला होता. महाराष्ट्रातील पहिल्याच आभ्यासिकेची संकल्पना समोर आल्याने शिवसेनेच्या महापौर अपेक्षा पाटील, स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी, रिपाइं आठवले गटाच्या उपमहापौर पंचशीला पवार यांनी पक्षभेदाला छेद देऊन अभ्यासिका होण्यासाठी प्रयत्न केले.

केंद्र आणि राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती पालिकेने वर्षभर साजरी करावी असा निर्णय घेतला. आंबेडकर चळवळीतील उपमहापौर पंचशीला पवार यांना जयंती महोत्सवाचे अध्यक्ष करण्यात आले आणि मनसेचा अभ्यासिकेचा पाठपुरावा फळाला आणताना महापौर अपेक्षा पाटील, आयुक्त मनोहर हिरे, उपमहापौर पंचशीला पवार,शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, सभागृहनेते धनंजय बोडारे, रिपाइंचे नाना पवार, नाना बागुल, भगवान भालेराव, उपायुक्त जमीर लेंगरेकर, शिक्षण मंडळ, मनवीसेचे बंडू देशमुख, मनोज शेलार आदींच्या उपस्थितीत अभ्यासिकेचे 14 एप्रिल 2016 मध्ये भूमिपूजन करण्यात आले. कोनशीलेवर प्रमुख उपस्थितांची नावे नमूद करण्यात आली.

पण आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी साधी निमंत्रण पत्रिका मिळाली नसल्याने माजी महापौर अपेक्षा पाटील, माजी उपमहापौर पंचशीला पवार यांनी नाराजगी व्यक्त केली. मात्र आजच्या उद्घाटन सोहळ्यात महापौर मीना आयलानी, सभागृह नेते, नगरसेवक मनोज लासी यांनी या अभ्यासिकेसाठी प्रयत्न करणारे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, माजी महापौर अपेक्षा पाटील, माजी स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी, माजी उपमहापौर पंचशीला पवार, मनवीसेचे बंडू देशमुख, मनोज शेलार यांची नावे घेऊन पोचपावती दिली. उपमहापौर जीवन इदनानी,मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, माजी आमदार कुमार आयलानी,नगरसेवक शेखर यादव, किशोर वनवारी,गजानन शेळके, नगरसेविका अंजली साळवे, अर्चना करणकाळे, कविता बागुल, माजी स्थायी सभापती प्रकाश माखिजा, प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते, लेखापाल निलम कदम-बोडारे, स्वतंत्र अभियंता भूषण पाटील, कंत्राटदार सुनील पिंपळे आदी यावेळी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com