शिवसेना नेत्यांशी संबंधितांच्या घरावर आयकर खात्याचे छापे

Income Tax raid
Income Tax raidSakal media

मुंबई : शिवसेना (shivsena) नेत्यांशी संबंधित काहीजणांच्या घरावर आज आयकर खात्याच्या (income tax raid) अधिकाऱ्यांनी छापे घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. युवासेनेचे वांद्रे येथील नेते राहूल कनाल (Rahul kanal) तसेच अंधेरीतील युवासेना नेते संजय कदम (sanjay kadam) यांच्याशी संबंधित घरांवर आयकर अधिकाऱ्यांनी छापे घालून तपासणी केली.

Income Tax raid
कनेक्टिंग डॉट्स : महामारीसोबत जगणे शिकायला हवे!

विशेष म्हणजे हे दोघे भाजप आमदार अनुक्रमे आशिष शेलार व अमित साटम यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. त्याचमुळे हे छापे घातले असावे, अशीही चर्चा सुरु आहे. कनाल हे शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे ट्रस्टीही आहेत. शिवसेनेचे एक तरुण मंत्री तसेच मातोश्रीशी जवळचे संबंध असलेले मंत्री यांच्याशी हे दोघे संबंधित असल्याचे वृत्त पीटीआय ने दिले आहे.

तर आज संध्याकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद असल्यानेच त्यापूर्वी सकाळपासूनच हे छापे घालण्यात आल्याचीही चर्चा होती. याआधीच आयकर खात्याने शिवसेनेचे महापालिकेतील वजनदार नेते यशवंत जाधव तसेच त्यांच्याशी संबंधित कंत्राटदारांवरही छापे घालून तपासणी केली होती. आज मुंबई व पुण्यातील वीस ठिकाणांवर छापे घातल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com