पंधरा ते एकोणीस वयोगटांतील मुलींच्या गर्भपातांमध्ये वाढ 

हर्षदा परब
बुधवार, 17 मे 2017

मुंबई- मुंबई महानगर पालिका हद्दीत होणाऱ्या गर्भपातांमध्ये 15 वर्षांखालील आणि 15 ते 19 वर्षांपर्यंच्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे. वर्षागणिक या  आकडेवारीत वाढ होत असल्याचेही आरटीआयच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. 

मुंबई- मुंबई महानगर पालिका हद्दीत होणाऱ्या गर्भपातांमध्ये 15 वर्षांखालील आणि 15 ते 19 वर्षांपर्यंच्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे. वर्षागणिक या  आकडेवारीत वाढ होत असल्याचेही आरटीआयच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. 

मुंबई महापालिकेच्या कुटूंब कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार एप्रिल 2016 ते मार्च 2017 या वर्षात 15 ते 19 वर्षे वयाच्या 491 मुलींचे गर्भपात झाल्याची नोंद मुंबई महापालिकेच्या कुटूंब कल्याण विभागात आहे. त्यापैकी 483 मुली या 15 ते 19 वर्षे वयोगटातील आहेत. 2013 ते 2015 या काळात होणाऱ्या गर्भपातांमध्ये 15 वर्षांखलील 267 मुलींचे गर्भपात झाले. या तीन वर्षांमध्ये 15 ते 19 वर्षांमधील 3114 मुलींचा गर्भपात करण्यात आला. 15 वर्षांखालील मुलींच्या गर्भपातात 2013 ते 2015 या काळात वाढ झाली आाहे. असे असले तरी 15 ते 19 वर्षांमधील मुलींच्या गर्भपाताचे प्रमाण घटते आहे. 

मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबई महापालिकेच्या कुटूंब कल्याण विभागातून आरटीआयच्या माध्यमातून ही आकडेवारी मिळवली आहे. या आकडेवारीच्या लहान वयोगटातील मुलींचे होणारे गर्भपात हो धोक्याची घंटा असून या वयोगटाटील मुलींना या भयानक परिस्थितीतून वाचविण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे ते सांगतात. तसेच 2016 ते 2017 या काळात गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये 

गर्भपातामुळे झालेल्या 4 मृत्यूंमध्ये 3 मृत्यू संसर्गाने झालेले मृत्यू आहे. त्यापैकी दोन महिलांचा गर्भपात हा पालिकेच्या के.ई.एम. आणि भाभा (वांद्रे) रुग्णालयात गर्भपात झाला होता. पालिकेच्या रुग्णालयात गर्भपात झाल्यानंतर संसर्ग होत असल्याने या महिलांना भरपाई देण्याची मागणी चेतन कोठारी यांनी पालिकेकडे केली आहे.   

गर्भनिरोधाच्या साधनांच्या अपयशामुळे 29 हजार गर्भपात

मार्च 2016 ते एप्रिल 2017 या 33,526 गर्भपातांची नोंद महापिलकेकडे आहे. त्यापैकी सर्वाधिक 29,700 गर्भपात हे गर्भनिरोधाच्या साधने अपयशी ठरल्यामुले झाल्याची नोंद पालिकेने केली आहे. 
 

खासगी रुग्णालयात सर्वाधिक गर्भपात 
2012 साल
एकूण गर्भपात 25,374
पालिका रुग्णालयातील गर्भपात - 4404
खासगी रुग्णालयातील गर्भपात - 20,970

गर्भपातामुळे 4 महिलांचा मृत्यू 
चारही महिला 25 ते 36 वर्षे वयोगटातील 
के.ई.एम, भाभा हॉस्पिटल (वांद्रे), वर्धन हॉस्पिटल (खासगी) हॉस्पिटलमध्ये गर्भपात झालेल्या तर, एका महिलेचा घरी गर्भपात झाला होता. 
मार्च 2016 ते एप्रिल 2017 ची आकडेवारी 
एकूण गर्भपात - 33,526 
बलात्कारामुळे होणारे गर्भपात - 47 
सर्वाधिक गर्भपात 25 ते 29 वर्षे वयोगटात - 11,684
महिलेने गर्भपाताबरोबर तिच्या नवऱ्याने नसबंदीचे प्रमाण अत्यल्प - 3095
अविवाहीत महिला मुलींचे गर्भपात - 1336    
 
धर्मनिहाय गर्भपात 
एकूण गर्भपात - 33,526 
हिंदू - 26,011
मुस्लिम - 6326 
ख्रिश्चन - 734 

 गर्भपात (वयोमानानुसार) 
15 वर्षांखालील - 8 
15 ते 19 वर्षे - 483 
20 ते 24 वर्षे - 6294 
25 ते 29 वर्षे - 11,684
30 ते 34 वर्षे - 9257 
35 ते 39 वर्षे - 4700 
40 ते 44 वर्षे - 1015 
45 वर्षे - 85