अपक्ष ठरवणार उमेदवारांचे भवितव्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

ठाणे - पालिका निवडणुकीत ३३ प्रभागातून १३१ जागांसाठी ८०५ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३५९ महिलांचा समावेश असून अपक्षांचे बंड थोपवण्यात विविध पक्षांना यश आले असले, तरी अद्यापही १९३ अपक्ष रिंगणात आहेत. यात ६१ अपक्ष महिलाही आहेत. पॅनेल पद्धतीने यंदाची निवडणूक होत असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात अपक्ष रिंगणात असल्याने त्यांचा फायदा कोणाला होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

२८८ बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, तर ५५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यात भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून एकाला उमेदवारी मिळाल्यानंतरही चुलत भावासाठी त्याने माघार घेतली आहे. राष्ट्रवादीतही एकाचा अर्ज बाद झाला असून एकाने निवडणुकीतून माघार घेतली आहे. यंदा ८०५ उमेदवार मैदानात असून यात १०० नगरसेवक नशीब अजमावत आहेत. ८०५ उमेदवारांमध्ये ४४६ पुरुष आणि ३५९ महिलांचा समावेश आहे. सर्वच पक्षांनी  महिलांना मोठी संधी दिली आहे. शिवसेना १३१ पैकी १२० जागांवर निवडणूक लढवत असून त्यांनी तब्बल ५३ पुरुषांसह ६७ महिलांना संधी दिली आहे. काही पुरुष प्रभागांतही महिलांना संधी देण्यात आली आहे. काही ठिकाणी तर तीन महिला आणि एक पुरुष अशीही उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या खालोखाल प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या भाजपचा क्रमांक लागत असून ते १२३ जागांवर ते लढत असून त्यातील तीन जागा निवडणुकीपूर्वीच कमी झाल्या आहेत. पक्षातर्फे १२० पैकी ६३ जागांवर महिला उमेदवार, तर ५७ जागांवर पुरुष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मनसेही महिलांना उमेदवारी देण्यात पिछाडीवर नसून त्यांनीही १११ पैकी ५४ जागांवर महिलांना संधी दिली असून ५७ जागांवर पुरुष उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी ८७ जागा लढवत असून त्यांनी ४५ जागांवर पुरुष, तर ४२ जागांवर महिला उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ६० जागांपैकी ३२ जागांवर पुरुष आणि २८ जागांवर महिला उमेदवार दिले आहेत.

मुंबई

मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर लेप्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित...

12.42 PM

मुंबई : जुहू चौपाटी येथील मोरागाव येथे आज (बुधवार) सकाळी डॉल्फिनचा मृतदेह आढळून आला. किनारपट्टीच्या कचऱ्याच्या बाजूलाच...

11.36 AM

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा...

05.24 AM