क्रिकेट संघाचे ट्रेनर राजेश सावंत यांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सहसचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले, की आज सकाळी संघाच्या सरावावेळी ते उपस्थित न राहिल्यानंतर चौकशीवेळी त्यांचा मृतदेह आढळून आला. रत्नाकर शेट्टी यांना याबाबतचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. 
 
मुंबई - भारत अ आणि 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर राजेश सावंत (वय 30) यांचा मृतदेह आज (रविवार) सकाळी हॉटेलमध्ये आढळून आला.

राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघाचे राजेश सावंत फिटनेस ट्रेनर होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे सरावासाठी ते उपलब्ध नसल्याने चौकशी करण्यात आली. त्यांच्या रुमवर गेले असता त्यांचा मृतदेह आढळला. झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय संघ सोमवारपासून वानखेडे मैदानावर इंग्लंड संघाबरोबर एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यानंतर चारदिवसीय दोन सामने होणार आहेत. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सहसचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले, की आज सकाळी संघाच्या सरावावेळी ते उपस्थित न राहिल्यानंतर चौकशीवेळी त्यांचा मृतदेह आढळून आला. रत्नाकर शेट्टी यांना याबाबतचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. 
 
मुंबई

तुर्भे - बोनकोडे सेक्‍टर- ११ मधील नाल्यात एमआयडीसीतील कंपन्या रासायनिक सांडपाणी सोडत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला...

03.03 AM

ठाणे - अर्ध्याहून अधिक रस्ते व्यापलेले मंडप, रस्त्यावर खड्डे खणून बांधलेल्या कमानी, तीन फुटांपेक्षाही उंच मंडपांचे अवाढव्य...

03.03 AM

गोरेगाव - वेतनापासून कामाच्या वेळांबाबत विविध मागण्यांसाठी सिने कामगार संघटनांनी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुकारलेल्या...

02.48 AM