एक हजार पानांचे दोषारोपपत्र तयार

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

मुंबई - पवईतील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी पवई पोलिसांनी एक हजार पानांचे दोषारोपपत्र तयार केले आहे. सोमवारी ते न्यायालयात सादर केले जाईल. पोलिसांनी चौघांना फरारी घोषित केल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. त्यात दोन डॉक्‍टरही आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतरच या डॉक्‍टरांबाबत कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच, रॅकेटमधील ब्रिजकिशोर जैस्वालचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचेही दोषारोपपत्रात म्हटले आहे. 

जुलैमध्ये पवई पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी भजेंद्र हिरालाल भिसेन, किशन बिज्रकिशोर जैस्वाल, इक्‍बाल सिद्धिकी, भारतभूषण शर्मा, नीलेश कांबळे, ख्वॉजा पटेल, यूसूफसा दिवाण, बिज्रकिशोर जैस्वाल, शोभना दिनेशभाई ठाकोर ऊर्फ शोभादेवी, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजीत चटर्जी, डॉ. मुकेश शेट्टे, डॉ. मुकेश शहा, डॉ. प्रकाशचंद्र शेट्टी, डॉ. कर्नल अनुराग नाईक यांना पवई पोलिसांनी अटक केली होती. तपास पूर्ण करून हजार पानांचे दोषारोपपत्र तयार केले आहे. त्यात तक्रारदार आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह तब्बल ३० जणांचे जबाब आहेत. या प्रकरणात दोन डॉक्‍टरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांची आरोग्य विभागाने चौकशी केली. त्याचा अहवाल पोलिसांना 
मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.