जलयुक्त शिवारसाठी खासगी कंपन्यांचा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत खासगी कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकीतून गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. मागील आठवड्यात 58 ठिकाणच्या बंधाऱ्यांमधील 24 हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यात तलाव, नदी खोलीकरण, नाला बांध यांचा समावेश असून, नदी खोली करण्याची तीन ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व कामांवर देखरेख ठेवली जात असून, प्रत्येक दिवसाच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल थेट मंत्रालयात पाठवण्यात येत आहे, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. 

शहापूर तालुक्‍यातील ठक्करपाडा, कसारा येथील दोन गाव तलाव व दहागाव येथील गाव तलावाचे काम जिंदाल स्टील वर्क्‍सने हाती घेतले आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनने शहापूर तालुक्‍यातील वाशाळा नाला बांध, वाशाळा येथीलच सिमेंट नाला बांध; तसेच अंबरनाथ तालुक्‍यातील करवले येथील नदी खोलीकरण आणि गोरपे गाव तलावाचे काम हाती घेतले आहे. टेक्‍नोक्राफ्ट इंडस्ट्रीजने मुरबाडमधील बेसलेपाडा, वैशाखरे, तळवली, बारागाव येथील; तर आयआरबी कंपनीने मुरबाडमधील दुधनोली माती नाला बांध आणि कुंदे येथील गाव तलावाचे काम घेतले आहे. कुंदेच्या आणखी एका तलावाचे काम सेंच्युरी रेयॉन करीत आहे. शहापूर तालुक्‍यातील दहिवली गाव तलावाचे काम कर्म रेसिडेन्सी, धसई; तर भिवंडी तालुक्‍यातील वाहुली आणि लाप बुगाव तलावांची कामे लोढा फाऊंडेशन करीत आहे. अंबरनाथ तालुक्‍यातील खरड नदी खोलीकरणाचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे आशुतोष इवले कंपनी करीत आहे. 

बदलापूर नगरपालिकेने चोण गाव तलाव, लिबर्टी ऑईल मिलने ढेंगणमाळ कोल्हापूर बंधारा, कर्म रेसिडेन्सीने मुळगाव गाव तलाव अशी कामे हाती घेतली आहेत. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने भिवंडी आणि कल्याण उपविभागातील कामे घेतली आहेत. अंबरनाथमधील भोज लघु प्रकल्प, उसगांव लघु प्रकल्प, शहापूरमधील वेहळोली, खराडे, व मुरबाडमधील जांभूर्डे प्रकल्पातील गाळ काढण्यात येत आहे.