कचरा डबा कळीचा मुद्दा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : "कचरामुक्त मुंबई' या संकल्पनेनुसार शहरातील कचरा संकलन करून कॉम्पॅक्‍टरद्वारे तो उचलून नेण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका चार कोटींचा खर्च करून तब्बल कचऱ्याचे एक हजार डबे खरेदी करणार आहेत. एका कचरा डब्याची किंमत 37 हजार 780 रुपये आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला आहे. स्थायी समितीत प्रशासनाने आणलेल्या या प्रस्तावावर डब्याच्या किमतीवरून बुधवारी जोरदार खडाजंगी होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईतील 24 विभागांतील केंद्रातून कचरा गोळा केला जातो. त्यासाठी 1.1 घनमीटर क्षमतेच्या डब्यांची आवश्‍यकता असते. केंद्रावर सुमारे सहा हजार डबे ठेवण्यात आले आहेत. डबे खराब झाल्यामुळे ते बदलून नव्याने आणावे लागतात. तीन वर्षांपूर्वी 1 हजार 825 कचऱ्याचे डबे खरेदी केले होते. सध्या डब्यांची कमतरता असल्याने नव्याने डबे खरेदी करावे लागत असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. 

या डब्यांची बांधणी आणि पुरवठा करण्यासाठी मे. मॅक इन्वायरो सोल्युशन्स (इंडिया) प्रा. लिमिटेड यांना काम दिले आहे. त्यांच्याकडून एक हजार डबे घेतले जाणार आहेत. हे डबे टप्प्याटप्प्याने पुरविले जातील; मात्र डब्यांच्या किमतीवरून स्थायी समितीत खडाजंगी होण्याची शक्‍यता आहे. 
 
Web Title: The issue of garbage bud