कर्नाटकला जाणाऱ्या गाड्यांवर "जय महाराष्ट्र'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

ठाणे - "जय महाराष्ट्र'ची घोषणा देणाऱ्या कर्नाटकमधील महापालिका व नगरपालिका सदस्यांचे पद रद्द करण्याबाबत कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन मंत्री यांनी केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 23) ठाण्यात आंदोलन केले. कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर "जय महाराष्ट्र' लिहून त्या पुढे पाठविण्यात येऊन अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या वंदना आगारातही कर्नाटकला जाणाऱ्या बसवर "जय महाराष्ट्र' लिहण्यात आले.