जायकवाडीतून परभणीसाठी पाणी - रावते

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

मुंबई - परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी आवर्तन 1 डिसेंबर 2016 पासून सुरू करण्यात यावे. जिल्ह्यात रब्बी हंगामात पूर्ण कालवा क्षमतेने सिंचन करण्यात यावे. तसेच जायकवाडी प्रकल्पामधून उन्हाळी पिकांसाठी तीन आवर्तने देण्यात यावीत, अशा सूचना पालकमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या.

मुंबई - परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी आवर्तन 1 डिसेंबर 2016 पासून सुरू करण्यात यावे. जिल्ह्यात रब्बी हंगामात पूर्ण कालवा क्षमतेने सिंचन करण्यात यावे. तसेच जायकवाडी प्रकल्पामधून उन्हाळी पिकांसाठी तीन आवर्तने देण्यात यावीत, अशा सूचना पालकमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या.

रावते यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज परभणी जिल्ह्यातील सिंचन व बिगर सिंचन आरक्षणाबाबत आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी परभणी महापालिका आयुक्त राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सलगरकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसुकर, पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अंबोळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जालना पाटबंधारे विभाग आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री व संबंधित यंत्रणेचे कार्यकारी अभियंता यांच्यातील चर्चेनुसार परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै-2017 पर्यंत सादर केलेल्या पाणी आरक्षणास मंजुरी देण्यात आली.

जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामातून वाढलेला पाणीसाठा व निम्न दुधना प्रकल्पातून उपलब्ध होणारा वाढीव पाणीसाठा यामुळे या वर्षी सिंचन क्षमता वाढविण्यात यावी, अशी सूचनाही या वेळी रावते यांनी केली. अतिवृष्टीमुळे कालवा वितरण प्रणालीचे नुकसान झाले आहे. कालव्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे कालवा स्वच्छ करण्यासाठी जलयुक्त शिवारासाठी खरेदी केलेली यंत्रसामग्री जलसंपदा विभागास उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. या वर्षी येलदरी धरणात असमाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे परभणी महापालिकेला येलदरी धरणाऐवजी निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याबाबत उचित कार्यवाही करावी, असा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

मुंबई

मीरा-भाईंदर - मीरा-भाईंदर महापालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ता मिळविली. भाजपने जोरदार...

05.33 AM

तुर्भे - महापालिकेच्या विविध विभागांतील कंत्राटी कामगारांनी सोमवारी (ता. २१) पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून किमान...

04.27 AM

नवी मुंबई - अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या आकृतिबंधावर अखेर राज्य सरकारने सोमवारी शिक्कामोर्तब केले....

03.27 AM