बाबासाहेबांचे स्मारक सरकारला 2019 पर्यंत लांबवायचंय- जयंत पाटील

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

संघाचा शब्द आमच्यावर लादतायत

एकनाथ गायकवाड यांनी सरकार संघाचा समरसता हा शब्द आमच्यावर लादत असल्याचा आरोपही ही केला. ते म्हणाले, आजचा दिवस हा समता दिन आहे पण आज केंद्र सरकारने समरसता दिन म्हणून जाहीर केला आहे. हे खूप वाईट असल्याचे सांगत गायकवाड यांनी सरकरचा निषेध केला.

मुंबई : सरकार इंदू मिलबाबत फसवणूक करत आहे. पाच एकरावर CRZ लागू केल्याने स्मरकाची शोभा जाईल. स्मारक बनवायचं सरकारच्या मनात आहे का याबाबत शंका आहे. इतर कोणत्या स्मारकाला CRZ लागू करत नाही यालाच का केला जातोय, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला. सरकारला 2019 पर्यंत स्मारक लांबवायचे आहे म्हणून हे सारं केलं जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यास लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळला. सकाळपासूनच चैत्यभूमीवर नागरिकांनी गर्दी केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे, पशू दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, मुंबईच्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार भाई जगताप, आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, काँग्रस प्रवक्ते राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जंयत पाटील, चित्रा वाघ, सचिन अहिर यांच्यासह मान्यवर नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

माजी खासदार एकनाथ गायकवाड म्हणाले, आजचा दिवस हा आमच्यासाठी मोठा दिवस आहे. सरकारने इंदू मिलची जागा आणि आता काही भागात CRZ लागू करत आहेत हे सरकर फसवत असल्याची टीका करत गायकवाड यांनी सर्व जागा ही स्मारकासाठी दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

एकनाथ गायकवाड यांनी सरकार संघाचा समरसता हा शब्द आमच्यावर लागू करत असल्याचा आरोपही ही केला. ते म्हणाले, आजचा दिवस हा समता दिन आहे पण आज केंद्र सरकारने समरसता दिन म्हणून जाहीर केला आहे. हे खूप वाईट असल्याचे सांगत गायकवाड यांनी सरकरचा निषेध केला.

यावेळी मंत्री महादेव जानकर म्हणाले, बाबासाहेबांना फक्त दलितांचे नेते म्हणण्याऐवजी सर्वव्यापी बाबासाहेब असा उल्लेख करावा. केंद्र सरकर किंवा राज्य सरकार इंदू मिलचे जागेचा प्रश्न सोडवत जागतिक दर्जीचे स्मारक उभा करेल याचा मला विश्वास आहे. आम्ही बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यास कटिबद्ध असल्याचेही महादेव जानकर यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा आजचा चागला दिवस आहे. 12 एकर जमीन दिल्यानंतर आता सरकार 5 एकर CRZ लागू करत आहे हे चुकीचं आहे. सरकारला समुद्रकिनारी असलेले मोठे बंगले दिसत नाहीत का, असा प्रश्न विचारत कांँग्रेस आता या विरोधात लढा देणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

Web Title: jayant patil blames fadnavis govt for pending ambedkar memorial